Pimpri : मुख्य लेखापाल पदनामाचे ‘मुख्य लेखा अधिकारी’ असे नामकरण 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील ‘मुख्य लेखापाल’ या पदाचा उल्लेख आता ‘मुख्य लेखा अधिकारी’ असा करण्यात येणार आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी तशा सुचना सर्व विभागप्रमुखांना दिल्या आहेत.

राज्याच्या नगरविकास विभागाकडील 23 मे 2018 च्या अधिसुचनेनुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेकडील महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा संवर्गातील सहसंचालक दर्जाच्या अधिका-यांना ‘मुख्य लेखा अधिकारी’ म्हणून प्रतिनियुक्तीवर भरण्याबाबत अधिसुचना देण्यात आल्या आहेत. या आदेशाच्या अनुषंगाने सहसंचालक, लेखा व कोषागारे संवर्गातील अधिकारी यांना पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये ‘मुख्य लेखा अधिकारी’ म्हणून पदस्थापना देण्यात आली आहे.

शासकीय आदेशानुसार महापालिका अस्थापनावरील ‘मुख्य लेखापाल’ या पदाचे नाव ‘मुख्य लेखा अधिकारी’ असे बदलण्यास महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मान्यता दिली आहे. त्यानुसार ‘मुख्य लेखापाल’ या पदाला यापुढे ‘मुख्य लेखा अधिकारी’ असे संबोधावे. त्याचबरोबर लेखा विभागाच्या प्रमुखांकडे कोणताही पत्रव्यवहार करताना ‘मुख्य लेखा अधिकारी’ या नावाने करण्यात यावा, अशा सुचना सर्व विभागप्रमुखांना करण्यात आल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.