Chikhali : बेवारस वाहने, टप-यांवर कारवाई

एमपीसी न्यूज – पिंपरी -चिंचवड महानगरपालिका क क्षेत्रीय (Chikhali) कार्यालय, अतिक्रमण पथकाच्या मार्फ़त, प्रभाग क्र.2 मधील कुदळवाडी – चिखली परिसरातील बेवारस वाहनांवर व टप-यावंर अतिक्रमण निष्कासनाची  कारवाई आज (बुधवारी) करण्यात आली.

Chinchwad : तरुणाच्या त्रासाला कंटाळून महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे , उप अभियंता सुर्यकांत मोहिते, प्रशासन अधिकारी दशरथ कांबळे यांच्या नेतृत्वाखाली कनिष्ठ अभियंता रचना दळवी, प्रियंका म्हस्के, व मनपा कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा बल,महाराष्ट्र पोलिस, यांच्या नियंत्रणाखाली ही कारवाई करण्यात आली.

प्रभाग क्र.2 मधील कुदळवाडी – चिखली परिसरातील ०2 बेवारस वाहनांवर व फ़ुटपाथवरील ०5 टप-यावंर अतिक्रमण निष्कासनाची कारवाई करण्यात आली.

या कारवाईत क क्षेत्रीय अतिक्रमण पथक, महाराष्ट्र सुरक्षा बल व महाराष्ट्र पोलीस पथक, अग्निशमन दल (चिखली), सहभागी झाले होते. दररोज शहराच्या विविध भागात अतिक्रमण कारवाई केली जात आहे. नागरिकांनी रस्त्यावर बेवारस वाहने उभी करुन नये तसेच अनधिकृत टप-या व पत्राशेड उभारु नये.

तसेच फ़ुटपाथ स्वच्छ  ठेवण्यासाठी सहकार्य करावे,  कारवाई केलेल्या ठिकाणी  परवानगी घेतल्याशिवाय अनधिकृत पत्राशेड / बांधकाम करु नये असे आवाहन करण्यात (Chikhali) आले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.