Chikhali : टेम्पो चालकाला धमकी देत लुबाडले

एमपीसी न्यूज – टेम्पो चालकाला मारण्याची धमकी देत लुबाडण्यात आले. ही घटना चिखली परिसरात शरद नगर झोपडपट्टी समोर घडली.

सुनील विनायक बिरादार (वय 36, रा. पुरंदर ट्रान्सपोर्ट, ट्रान्सपोर्टनगर, निगडी) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दुचाकीवरील दोन चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिरादार हे बुधवारी पहाटे टेम्पो पार्क केलेल्या ठिकाणी चालले होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांना मारण्याची धमकी दिली. तसेच त्यांच्याकडील मोबाईल व रोख दोन हजार रुपये असा एकूण चार हजार 900 रुपयांचा ऐवज जबरदस्तीने हिसकावून नेला. यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला असून चिखली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संदीप बागूल तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.