Gas Cylinder theft : पिकअप मधून साडे तीन लाखांचे गॅस सिलेंडर चोरीला

एमपीसी न्यूज : पिकअप मधून साडे तीन लाख रुपये किंमतीचे भरलेले 80 व्यावसायिक गॅस सिलेंडर चोरून नेले.(Gas Cylinder theft)ही घटना बुधवारी (दि. 24) रात्री साडेसात ते गुरुवारी (दि. 25) सकाळी साडेदहा वाजताच्या कालावधीत मोरेवस्ती, चिखली येथे घडली.

भिकचंद हिरालाल कात्रेला (वय 52, रा. मोरेवस्ती, चिखली) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पाच ते सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sandeep Waghere : विविध सामाजिक उपक्रमांनी संदीप वाघेरे यांचा वाढदिवस साजरा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड कंपनीचे 80 व्यावसायिक भरलेले गॅस सिलेंडर पिकअपमध्ये भरून ठेवले होते.(Gas Cylinder theft) बुधवारी रात्री त्यांनी पिकअप त्यांच्या घराजवळ पार्क केला. रात्रीच्या वेळी बोलेरो पिकअप मधून आलेल्या पाच ते सहा चोरट्यांनी पिकअपमधून तीन लाख 59 हजार 360 रुपयांचे सिलेंडर चोरून नेले. चिखली पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.