Cyclist death case: सायकलस्वार अपघाती मृत्यू प्रकरणी आय ए एस तर्फे पोलिस आयुक्तांना निवेदन

एमपीसी न्युज : इंडो अथलेटिक्स सोसायटीच्या वतीने मंगळवारी (दि.30) सायकलस्वार प्रशांत कुमार यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणाच्या तपासासाठी (Cyclist death case) पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांना निवेदन देण्यात आले आहे.

इंडो अथलेटिक्स सोसायटीच्या प्रतिनिधी मंडळ मध्ये यावेळी गजानन खैरे, गणेश भुजबळ,अजित पाटील, कैलास शेठ तापकीर, गिरीराज उमरीकर, अक्षय नारखेडे, प्रतीक पवार, चंद्रकांत पाटील, बाळासाहेब कांबळे, डॉ.सुमती डोळ, अजित गोरे, डॉ.अजय शर्मा , संदीप परदेशी, अमीर शेख , श्रेयस पाटील आनंदा पाटील त्याचप्रमाणे इतर सदस्य व प्रशांत कुमार यांच्या पत्नी शिल्पी कुमार उपस्थित होते.

Gas Cylinder theft : पिकअप मधून साडे तीन लाखांचे गॅस सिलेंडर चोरीला

निवेदनात म्हटले आहे की, कात्रज देहूरोड बायपास वर पुनावळे या ठिकाणी सायकल स्वार प्रशांत कुमार यांचा अपघाती मृत्यू  झाला.(Cyclist death case) या प्रकरणाचा तपास पोलिसांनी गंभीर्यानी करावा अशी मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणी इंडो अथलेटिक्स सोसायटी चे प्रतिनिधी मंडळ पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे रावेत आणि रावेत पोलीस स्टेशन या ठिकाणी आज पुन्हा भेट घेऊन पुढील तपासा प्रकरणी माहिती घेण्यात आली पोलीस अधीक्षक यांना या संदर्भात निवेदन देण्यात आले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.