Chikhali News : महाराष्ट्र वितरक सेनेच्यावतीने अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन

एमपीसीन्यूज : चिखली- ताम्हाणे वस्ती येथे शिवसेना प्रणित महाराष्ट्र वितरक सेना व शिवस्वराज्य प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

महाराष्ट्र वितरक सेनेचे पिंपरी चिंचवड शहर जिल्हाध्यक्ष अध्यक्ष रावसाहेब  थोरात, अजित चौगुले व संजय गाढवे यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या वेळी महाराष्ट्र वितरक सेना शहर सरचिटणीस वैभव छाजेड, शिवसेनेचे संजय गाढवे, विकास माने, राहुल सिंग, चेतन सावंत, अवदुत जाधव, वेभव जाधव ,वैभव थोरात, बाळासाहेब बांदल आदी उपस्थित होते.

रावसाहेब थोरात महणाले, अहिल्यादेवी होळकर यांनी जुन्या परंपरा मोडीत काढून सक्षमपणे गोरगरिबांना न्याय देणयाचे काम केले. शौर्य, धैर्य, आणि न्यायाच्या त्या मूर्तीमंत रूप आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.