Chikhali : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार व धमकी

एमपीसी न्यूज – तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून (Chikhali) तिच्यावर वेळोवेळी लैगिंक अत्याचार करत तिला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. हा प्रकार चिखली येथे नोव्हेंबर 2021 ते 20 फेब्रुवारी 2023 या कालावधी मध्ये घडला आहे.

याप्रकरणी 24 वर्षीय तरुणीने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून विकी वामन सोनटक्के (वय 30 रा.अमरावती) याच्या विरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना आरोपीने लग्नाचे खोटे आमिष दाखवले. यावेळी आरोपीने आमरावती, चिखली, लोणावळ्या विविध ठिकाणी फिर्यादीला नेऊन अत्याचार केले. तसेच याबबत कोणाला सांगितले तर दोन मिनिटांत गायब करेन कोणाला कलणार नाही, तुला व तुझ्या घरच्यांना मारून (Chikhali) टाकीन अशी धमकी दिली.

यावरून चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Maharashtra : दप्तर होणार हलके, आता पुस्तकातच असणार तुमची वही

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.