Alandi : आमलकी एकादशी निमित्त माऊलीं मंदिरात आकर्षक पुष्प सजावट

एमपीसी न्यूज : आळंदीमध्ये आमलकी (Alandi) एकादशी निमित्त 3 मार्च रोजी श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीच्या दर्शनासाठी माऊली मंदिरात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. आमलकी एकादशी निमित्त महाद्वारात व मंदिरात आकर्षक अशी पुष्पसजावट करण्यात आली होती.

मंदिर परिसरात भाविकांचे उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी हिरव्या जाळीचे आच्छादन वरून बांधण्यात आले आहे. एकादशी निमित्त मंदिरामध्ये (खीचडी) प्रसादाचे वाटप करण्यात आले होते.

बांधण्यात आलेल्या हिरव्या जाळीच्या शीतल छायेत अनेक भक्तांनी या प्रसादाचा यावेळी आस्वाद घेतला. मंदिर परिसरामधील दुकाने हार फुलांनी सजली होती.

Chikhali : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार व धमकी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.