Chinchwad Bye-Election : राहुल कलाटे यांचे डिपॉझिट जप्त; मविआला दिलासा!

एमपीसी न्यूज : पिंपरी चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणूकीत (Chinchwad Bye-Election) आमदार अश्विनी जगताप आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते नाना काटे यांच्यामध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळाली. जर या निवडणुकीत राहुल कलाटे यांनी बंडखोरी केली नसती, तर इथेही महाविकास आघाडी आपले स्थान बळकट बनवू शकली असती. पण, आता मविआला जागा नाही पण दिलासा देणारी गोष्ट म्हणजे राहुल कलाटे यांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. 

डिपॉझिट राखण्यासाठी निवडणूक आयोगानुसार एकूण मतदानाच्या 1/6 टक्के म्हणजेच 16.66% मते उमेदवाराने मिळवणे गरजेचे असते. पण राहुल कलाटे यांना 44 हजार 82  इतकी मते मिळाली. त्यांना डिपॉझिट राखण्यासाठी 47 हजार 833 एवढा आकडा गाठायचा होता. त्यामुळे त्यांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. नाना काटे यांना 1/6 टक्के एवढी मते मिळाल्याने त्यांचे डिपॉझिट जप्त होणार नाही.

राहुल कलाटे यांच्या सोबत चिंचवडमध्ये 26 उमेदवार तर कसबामध्ये (Chinchwad Bye-Election) अभिजीत बिचुकलेसह 14 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.

Alandi : आमलकी एकादशी निमित्त माऊलीं मंदिरात आकर्षक पुष्प सजावट

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.