Pimpri Crime : पिंपरीतील बौद्धनगर येथे हातात कोयते घेऊन टोळक्याची दहशत

एमपीसी न्यूज – हातात कोयते घेऊन एका तरुणाचा पाठलाग करत (Pimpri Crime) तो तरूण घरात घुसताच घराच्या दरवाज्यावर लाथा कोयते मारून तसेच शिवीगाळ करत परिसरात टोळक्याने दहशत माजवली. हा प्रकार गुरुवारी (दि.2) पिंपरीतील बौद्ध नगर येथे रात्री उशीरा घडला.

विशाल लक्ष्मण बनसोडे (वय 19 रा.पिंपरी) याने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अमन शेख, करण टाक, आशिष पाल, सागर धावारे, अभिजीत गायकवाड, सागर उर्फ एस.टी. त्याचे दोन ते तीन साथीदार सर्व रा, पिंपरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रात्री बाथरूमसाठी घराबाहेर आला असता त्याचा मित्र अभिमान पोपट भालेराव हा धावत आला व त्याने फिर्यादीला पोर आलीत घरात चल असे सांगितले. फिर्यादी व अभिमान घरात गेले व त्यांनी दरवाजा लावला.

यावेळी आरोपी तेथे आले व त्यांनी दाराला लाथा व कोयते मारत शिवीगाळ कऱण्यास सुरुवात केली. आव्या बाहेर ये, आम्हाला माहित आहे अविनाश माने घरात लपला आहे म्हणत त्यांनी गोंधळ घातला. दरवाजा उघडला नाही तर त्यांनी घराच्या दरवाज्याचे, खिडकीचे नुकसान केले. तसेच हातात कोयता फिरवून परिसरात दहशत पसरवली. यावरून आरोपीवर गुन्हा दाखल असून पोलीस त्याचा पुढील तपास करत आहेत.

Chinchwad Bye-Election : राहुल कलाटे यांचे डिपॉझिट जप्त; मविआला दिलासा!

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.