Chikhali : पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक

एमपीसी न्यूज – पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या दोन जणांना खंडणी विरोधी पथकाने सापळा लावून अटक केली. मंगळवारी चिखली परिसरात ही कारवाई केली.

संतोष दशरथ झावरे (वय 42, रा. सिद्धी हाईट्‌स, जाधववाडी, चिखली) आणि समाधान विनायक भदाणे (वय 27, दत्तवाडी, आकुर्डी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

खंडणी, दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक सुधीर अस्पत यांनी दिलेल्या माहितीनुसार, चिखली येथे पिस्तूल विक्रीसाठी एकजण येणार असल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल बढे यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून झावरे याला संशयावरून ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे एक पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस मिळून आले. त्याला हे पिस्तूल विक्रीसाठी देणाऱ्या भदाणे यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले. याबाबत अधिक तपास पोलिस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.