BNR-HDR-TOP-Mobile

Chikhli : ड्रायव्हिंग स्कूल व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्यात विविध मागण्यांसाठी बैठक

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहरातील ड्रायव्हिंग स्कूल संचालक व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्यात नुकतीच बैठक झाली. या बैठकीत ड्रायव्हिंग स्कूल संचालकांनी मांडलेल्या विविध मागण्यासंदर्भात चर्चा झाली. या मागण्यांबाबत लवकरच विचार केला जाईल असे आश्वासन उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी दिली.

चिखली येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात झालेल्याबैठकीच्या अध्यक्षस्थानी पुणे येथील आरटीओ अधिकारी संजय राऊत होते. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील, सुबोध मेधशिकर, चंद्रकांत जवळकर, राज्य मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे अध्यक्ष राजू घाटोळे, सरचिटणीस यशवंत कुंभार, पिंपरी-चिंचवड ड्रायव्हिंग असोसिएशनचे अध्यक्ष अनंत कुंभार, बापूसाहेब देशमुख, आकाश बुर्डे, विशाल बुर्डे, स्वप्नील पवार. जावेद पठाण, संतोष चोरगे, अतुल अहिरे, स्वप्नील सोनार आदी उपस्थित होते.

या बैठकीत ड्रायव्हिंग स्कूलच्या विविध मागण्या मांडण्यात आल्या. पिंपरी-चिंचवड कार्यालयाच्या चारचाकी प्रशिक्षणाच्या टेस्ट मोशी येथील ट्राफिक पार्क येथे घेण्यात याव्यात, शिकाऊ लायसन्स परीक्षेत नापास झालेल्या अर्जदारांना पुढील सात दिवसांत सकाळी साडेनऊपर्यंत कोणाच्याही परवानगीशिवाय परीक्षा घेण्याची सवलत द्यावी, शिकाऊ लायन्सेसला तीन महिने झाल्यावर स्लॉट बुकिंग टेस्ट सुटीच्या दिवशी घेण्यात याव्यात, पक्क्या लायन्सेस स्लॉट बुकिंग करताना येणारा सिक्युरिटी कोड रद्द करावा आदी मागण्या या बैठकीत मांडण्यात आल्या. एलएमव्ही व एमसीव्हीजी एकत्र असेल तर दोन पैकी एक अॅपोइंन्टमेंट असली तरी दोन्ही ड्रायव्हिंग टेस्ट घेण्यात याव्यात.

या बैठकीनंतर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील म्हणाले की, दीड महिन्यांत मोशी येथील ट्राफिक पार्क येथे लर्निंग परीक्षा घेण्यात येईल.तसेच या मागण्यांचा लवकरात लवकर विचार करण्यात येईल असे आश्वासन दिले.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3