BNR-HDR-TOP-Mobile

Pune : सिंहगड रोड पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचा कोठडीत मृत्यू; सीआयडीकडून तपास सुरू

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज- अवैधरित्या दारू विकताना आढळल्यामुळे अटक केलेल्या 60 वर्षीय आरोपीला पोलीस कोठडीत फिट आल्यामुळे ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला. नियमाप्रमाणे हा मृत्यू डेथ इन कस्टडी असल्यामुळे या प्रकरणाचा तपास आता राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) विभागाकडून करण्यात येत आहे.

सोपान मधुकर देवकर (वय 60) असे मृत्युमुखी झालेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड रोड पोलिसांचे कर्मचारी 10 एप्रिल रोजी आंबेगाव खुर्द भागात गस्त घालत असताना सोपान देवकर हे अवैध दारू विक्री करताना दिसले. पोलिसांनी त्यांच्याकडून पाच लिटर गावठी दारूचा कॅन जप्त केला होता. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करून पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते.

दरम्यान 11 एप्रिल रोजी पोलीस कोठडीत असताना त्यांना फिट आल्यामुळे त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे अतिदक्षता विभागात उपचार असताना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. अशाप्रकारे पोलीस कोठडीत आरोपीचा मृत्यू झाल्याने खळबळ माजली आहे. दरम्यान हा मृत्यू डेथ इन कस्टडी असल्यामुळे या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) विभागाकडून करण्यात येत आहे.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.