Maharashtra : डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी बदनामी प्रकरणी एकाला पुण्यातून अटक

एमपीसी न्यूज – ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांची बदनामी (Maharashtra) करण्याच्या हेतूने सोशल मीडियावर बनावट पत्रक व्हायरल केल्याप्रकरणी रायगड पोलिसांनी पुण्यातील तरुणाला एकाला अटक केली आहे. सोमवारी आरोपीला अलिबाग येथील जिल्हा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

शुभम काळे (वय 24) असे संशयीत तरुणाचे नाव असून तो पुण्यात एका सीए फर्ममध्ये असिस्टंट या पदावर नोकरी करीत आहे. पोलीस आणखी काही जणांना अटक कऱणार असल्याचेही रायगड पोलिसांनी सांगितले.

आप्पासाहेब धर्माधिकारी यांची बदनामी करण्याच्या हेतूने सोशल मीडियावर बनावट पत्रक व्हायरल केल्याप्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला होता. या बनावट पत्रकात भाजप आणि शिंदे गटाला मतदान करू नका, असं महाराष्ट्रभूषण आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावे आवाहन करणारे खोटे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

शनिवारी (दि.22) आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाचे हे पत्र समाजमाध्यमांवर प्रसारित झाले. अनेकांकडून हे (Maharashtra) पत्र व्हॉट्सअप-फेसबुक द्वारा व्हायरल करण्यात येत होतं.

 PCMC : महिला सबलीकरणासाठी ‘सिध्दी उपक्रम’,  300 महिला वाटणार मालमत्ता कराची बिले

दरम्यान, आप्पासाहेब धर्माधिकारी यांना शासनाकडून महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्याचा सोहळा 16 एप्रिल रोजी खारघरमध्ये उत्साहात पार पडला. मात्र, उष्माघातामुळे काहींचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी 17 एप्रिल रोजी सद्भावना पत्रक प्रसिद्ध करून घटनेबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली होती.

डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या अनुयायांमध्ये शासनाबाबत द्वेशाची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न झाला होता. हे पत्रक सोशल मीडियावर प्रसिद्ध केल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पो.नि. दयानंद गावडे यांच्याकडे सोपविण्यात आला होता. तपासाची सूत्रे वेगात फिरवून आरोपीचा शोध घेतला असता, शुभम काळे याला पुणे येथून संशयित म्हणून ताब्यात घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.