Talegaon Dabhade : पर्यावरणपूरक गणेशाची मूर्ती घडविण्यात मुले झाली दंग

एमपीसी न्यूज – वास्तू डेव्हलपर्स आणि रॉट्रक्ट क्लब ऑफ तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “एकदिवसीय पर्यावरणपूरक गणेश मूर्ती कार्यशाळे”चे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे हे सहावे वर्ष आहे. एकूण 150 शाळकरी मुलांनी यामध्ये सहभाग नोंदवला होता.

Daund : आईने पोटच्या मुलीचा गळा दाबून केला खून

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय राखीव दलाचे सहाय्यक कमांडर सचिन कदम उपस्थित होते. यावेळी उपस्थितांमध्ये पालक वर्गही मोठ्या प्रमाणावर उपस्थित होता. तर व्यासपीठावर रॉट्रक्ट क्लबचे सिद्धेश गायकवाड, हर्षद जव्हेरी,तसेच रॉट्रक्ट क्लब तळेगावचे महेश महाजन, उद्धव चितळे, दीपक फले आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना कदम म्हणाले की, पर्यावरणपूरक गणेशोत्सव हि काळाची गरज आहे. पर्यावरण संवर्धनाचे काम लहान मुलांवर बिंबवले तर भविष्यात एक आशादायी चित्र निर्माण होईल. त्यामुळे नक्कीच पुढची पिढी पर्यावरणाबाबत जागरूक राहील.

संचालक निलेश भोसले यांनी प्रास्ताविकात या उपक्रमाचा उद्देश उपस्थितांना सांगितला. तसेच दरवर्षी आमच्या या उपक्रमाला वाढता प्रतिसाद पाहून समाधान व्यक्त केले. केवळ सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही हा उपक्रम जोपासत आहोत असेही त्यांनी सांगितले. गणपती बनविण्याचे प्रशिक्षण स्न्हेहा राणे यांनी दिले. तसेच मुलांच्या शंकांचे निरसन देखील केले.

लहान मुलांना सहभागाबद्दलचे प्रमाणपत्र ज्येष्ठ साहित्यिक श्रीकृष्ण पुरंदरे आणि पोलीस निरीक्षक वाघ यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. त्यांनीही असे उपक्रम आयोजित केल्याबद्द्दल कौतुकही केले. पर्यावरणपूरक आणि निसर्गावर आधारित असे कार्यक्रम होणे हि काळाची गरज आहे असे देखील सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुसाक्षी जयकर यांनी केले तसेच या उपक्रमासाठी ओंकार वर्तले, धनंजय अत्रे, गजानन घाबडे, अभय व्यास, वैभव कुलकर्णी, संतोष परदेशी, प्रतीक मेहता, अवधुत सालूंके आदींनी परिश्रम घेतले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.