Daund : आईने पोटच्या मुलीचा गळा दाबून केला खून

एमपीसी न्यूज – मुलगी घराबाहेर जात असताना आईने तिला ओढत घरात आणले. तिला बेदम ( Daund) मारहाण करत गळा दाबून तिचा खून केला. ही घटना दौंड येथील रेल्वे क्वार्टरमध्ये घडली.

दीक्षा हरिओम जागिंड (वय 18, रा. रेल्वे क्वार्टर, दौंड. मूळ रा. राजस्थान) असे खून झालेल्या मुलीचे नाव आहे. हरिओम श्याम प्रसाद जागिंड (वय 44) यांनी याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सरिता हरिओम जागिंड हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Shirgaon : चांदखेड येथील दारूभट्टीवर अंमली पदार्थ विरोधी पथकाचा छापा

याबाबत सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी हे रेल्वे विभागात नोकरी करतात. त्यांना चार मुली आहेत. त्यांनी आदल्या दिवशी रात्रपाळी केल्याने ते दिवसभर घरी झोपले होते. सायंकाळी झोपेतून उठून ते पावणे सात वाजताच्या सुमारास तंबाखू आणण्यासाठी गेले. तंबाखू घेऊन सव्वासात वाजता ते घरी आले. त्यावेळी त्यांच्या 16 वर्षीय मुलीने त्यांना घरात घडलेला प्रकार सांगितला आणि त्यांच्या पायाखालची जमीन सरकली.

मुलगी दिक्षाचा आदल्या दिवशी शाळेत वाद झाला. त्यामुळे ती दिवसभर घरात कोणाला काहीही बोलली नव्हती. वडील हरिओम हे घराबाहेर गेल्यानंतर ती देखील कोणाला काहीही न सांगता घराबाहेर जाऊ लागली. त्यावेळी तिची आई आरोपी संगीता हिने दीक्षाला घरात ओढत आणले. तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून तिचा गळा दाबून खून केला. दौंड पोलीस तपास करीत ( Daund) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.