Shirgaon : चांदखेड येथील दारूभट्टीवर अंमली पदार्थ विरोधी पथकाचा छापा

एमपीसी न्यूज – चांदखेड ते कासारसाई रस्त्याच्या बाजूला सुरु असलेल्या दारूभट्टीवर अंमली पदार्थ विरोधी पथकाने छापा मारून कारवाई केली. ही कारवाई रविवारी (दि. 10) दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास करण्यात आली.

Bhosari : कंपनीच्या शॉपचा पत्रा उचकटून जॉब चोरीला

पोलीस अंमलदार प्रसाद जंगीलवाड यांनी याप्रकरणी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने चांदखेड ते कासारसाई रस्त्यावर गावठी हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी कच्चे रसायन बाळगून त्याची दारूभट्टी लावली. याबाबत माहिती मिळाली असता पोलिसांनी छापा मारून कारवाई करत 75  हजार रुपये किमतीचा मुद्देमाल नष्ट केला. पोलीस आल्याची चाहूल लागताच महिला पळून गेली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. शिरगाव (Shirgaon) पोलीस तपास करीत आहेत.

https://youtu.be/m04gHSobCPY?si=lcEmjFc_zokBWcld

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.