Chakan : दारूभट्टीवरील छाप्यात 10 लाख 50 हजारांचा मुद्देमाल नष्ट

एमपीसी न्यूज – चाकण पोलिसांनी वाकी खुर्द येथे एका ( Chakan ) दारूभट्टीवर छापा मारून कारवाई केली. त्यात पोलिसांनी दारू तयार करण्यासाठी लागणारे कच्चे रसायन आणि तयार दारू असा एकूण 10 लाख 50 हजारांचा मुद्देमाल नष्ट केला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 14) सकाळी करण्यात आली.

आदित्य रघु कुंभार (वय 19, रा. चाकण), अजय रघु कुंभार (वय 25, रा. चाकण) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार अशोक दिवटे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी वाकी खुर्द गावात भामा नदीच्या काठावर दारू भट्टी लावली. एका खड्ड्यात आरोपींनी गुळ, नवसागर, तुरटी, प्लास्टिक पिशव्या, पोत्याचा बारदाना टाकून 50 हजार लिटर कच्चे रसायन रापत ठेवले होते. तसेच आरोपींनी सात हजार लिटर दारू तयार केली होती.

Talegaon Dabhade : गरीब, महिला, युवक व शेतकरी वर्गाला अनुकूल केंद्रीय अर्थसंकल्प – डॉ. हनुमंत शिंदे

या दारू भट्टी बाबत माहिती मिळाल्यानंतर चाकण पोलिसांनी गुरुवारी सकाळी आठ वाजता दारू भट्टीवर छापा मारून कारवाई केली. त्यामध्ये पोलिसांनी 50 हजार लिटर कच्चे रसायन, 700 लिटर तयार दारू आणि इतर साहित्य असा एकूण 10 लाख 50 हजारांचा मुद्देमाल नष्ट केला आहे. चाकण पोलीस तपास करीत ( Chakan ) आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.