Bhosari : कंपनी शॉपचा पत्रा उचकटून जॉब चोरीला

एमपीसी न्यूज –  शॉपचा पत्रा ऊचकटून चोरट्यांनी शॉप मधून 64 हजार रुपये किंमतीचे जॉब ( Bhosari ) चोरून नेले. ही घटना शुक्रवारी (दि. 8) सकाळी नऊ वाजताच्या सुमारास लांडगे वस्ती भोसरी येथील आदित्य एंटरप्राईजेस या शॉपमध्ये उघडकीस आली.

Pune : स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे संगीत पुरस्कार पंडित केशव गिंडे यांना जाहीर

अरविंद रघुनाथ जगताप (वय 48, रा. सद्गुरु नगर, भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जगताप यांचे लांडगे वस्ती भोसरी येथे आदित्य एंटरप्राइजेस नावाचे शॉप आहे. गुरुवारी रात्री नऊ ते शुक्रवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी शॉपचा लोखंडी पत्रा उचकटून आत प्रवेश केला. शॉप मधून 64 हजार रुपये किमतीचे जॉब चोरट्यांनी चोरून नेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलीस तपास ( Bhosari ) करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.