Pune : स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे संगीत पुरस्कार पंडित केशव गिंडे यांना जाहीर

एमपीसी न्यूज – हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या प्रचार व प्रसारासाठी गेली 44 वर्षे सातत्याने कार्य करणारी ( Pune) गानवर्धन संस्था व तात्यासाहेब नातू फाउंडेशनतर्फे दिल्या जाणाऱ्या स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे शास्त्रीय संगीत पुरस्काराने ज्येष्ठ बारसीवादक, संशोधक, विचारवंत पंडित केशव गिंडे यांना गौरविले जाणार आहे, असे गानवर्धन संस्थेचे अध्यक्ष दयानंद घोटकर यांनी निवेदनाद्वारे कळविले आहे.

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात आपले भरीव योगदान देणाऱ्या कलाकाराची निवड करून त्यास गेल्या 11 वर्षांपासून पुरस्कार देण्यात येत आहे. शाल, श्रीफळ, सन्मानपत्र आणि 50 हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यंदाचा पुरस्कार वितरण सोहळा रविवार, दि. 17 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5:30 वाजता टिळक स्मारक मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पद्मविभूषण स्वरयोगिनी डॉ. प्रभाताई अत्रे यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.

Pune : खेलो इंडिया महिला लीग पिंचाक सिलाट स्पर्धेत पुणे ग्रामीणचे उगवते तारे २७ पदकांसह चमकले

या प्रसंगी सुप्रसिद्ध शैक्षणिक विचारवंत व संत साहित्याचे संवर्धक डॉ. विश्वनाथ कराड कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. चाणक्य मंडळाचे संस्थापक, प्रसिद्ध शैक्षणिक विचारवंत अविनाश धर्माधिकारी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर पंडित केशव गिंडे आणि त्यांच्या शिष्यवर्गाचे बासरीवादन होणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.

 

पंडित व्यंकटेशकुमार, पंडित विनायक तोरवी, विदुषी श्रुती सडोलीकर-काटकर, पंडित डॉ. विकास कशाळकर, विदुषी अश्विनी भिडे-देशपांडे, पंडित आनंद भाटे, पंडित रघुनंदन पणशीकर, विदुषी अलका मारुलकर, पंडित विजय कोपरकर, पंडित धनंजय दैठणकर, विदुषी कलापिनी कोमकली अशा दिग्गज कलाकारांना स्वररोगिनी डॉ. प्रभा अत्रे शास्त्रीय संगीत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे, असे गानवर्धन संस्थेचे अध्यक्ष दयानंद घोटकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनाद्वारे कळविले आहे.

पंडित केशव गिंडे यांच्याविषयी…

पंडित केशव गिंडे यांना त्यांच्या वयाच्या सहाव्या वर्षी त्यांचे आजोबा पंडित दामोदर गिंडे यांनी भजनाच्या साथीसाठी मृदंग वाजवायला शिकविले. भावंडांच्या विविध वाद्य वादनाने प्रभावित होऊन लहान वयातच गिंडे यांनी व्हायोलिन, सतार, दिलरुबा आणि तबला ही वाद्ये हाताळली; परंतु आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना ही वाद्ये शिकणे शक्य झाले नाही. त्यांच्या आईने कृष्णपूजनाच्या निमित्ताने त्यांच्यासाठी बासरी आणली आणि मुलाला बासरी वादक बनविण्याचे स्वप्न उराशी बाळगले.

महाविद्यालयीन काळात पंडित गिंडे यांना ज्येष्ठ हार्मोनियम वादक पंडित बोरकर यांचे संगीतविषयक मार्गदर्शन मिळाले. पुढे पंडित पन्नालाल घोष यांचे पहिले शिष्य व सुहृद पंडित हरिपाद चौधरी तसेच पंडित पन्नालाल घोष यांचे जावई पंडित देवेन्द्र मुर्डेश्वर यांच्याकडून त्यांना बासरी वादनाचे शिक्षण मिळाले.

पंडित गिंडे यांच्या बासरीवादनावर प्रामुख्याने पंडित पन्नालाल घोष यांच्या वादन शैलीचा प्रभाव जाणवतो. गायकी व तंतकारी (बीनकारी) हे पंडित गिंडे यांच्या वादनाचे वैशिष्ट्य आहे. पंडित गिंडे यांना आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवरील अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात ( Pune) आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.