Chinchwad : काम करत असलेल्या कंपनीच्या डेटाचा गैरवापर करून स्वतःची कंपनी स्थापन करत केला तब्बल 48 लाखांचा अपहार

एमपीसी न्यूज – काम करत असलेल्या कंपनीचा(Chinchwad) डाटा, गोपनीय माहिती, कंपनीचे स्पेशल पर्पज मशीन ही माहिती चोरून दुसऱ्या कंपनीला देत प्रोडक्ट मटेरिअल तयार करून घेतले व ते स्वतःच्या कंपनीच्या नावावर विकून तब्बल 48 लाख रुपयांची कंपनीची फसवणूक केली आहे. हा सारा प्रकार 23 ऑक्टोबर 218 ते 14 ऑक्टोबर 2022 या चार वर्षाच्या कालावधीत चिंचवड एमआयडीसीतील अडव्हेंट कंपनी येथे घडत होता.

याप्रकऱणी महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून आकाश रमेश लिंबाचिया (वय 31 रा.पुनावळे) याच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हा अडव्हेंट कंपनी येथे काम करत होता. यावेळी त्याने त्याची R&D Technologies या नावाने कंपनी बनवली. यावेळी अडव्हेंट कंपनीचा डेटा, गोपनीय माहिती, प्रेस टुल्स, कंपनीने बिजनेससाठी तयार केलेले स्पेशल पर्पज मशीन कस्टमर इनक्वायरी या साऱ्या गोष्टी परस्पर चोरून दुसऱ्या कंपनीला दिल्या.

Metro News : विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर मेट्रो करणार दंडात्मक कारवाई

त्या कंपनीकडून प्रोडक्य मटेरिअल तयार (Chinchwad)करून घेतले व ते स्वतःच्या R&D Technologies या कंपनीच्या नावाने विकले या कालावधीत त्याने कंपनीचा डाटा वापरून तब्ब्ल 48 लाख रुपयांचा बिजनेस केला व अडव्हेंट कंपनीकडून 40 लाख 65 हजार 736 रुपयांची पगार देखील घेतली. अशा प्रकारे कंपीनीची फसवणूक करत अपहार केल्या प्रकऱणी पिंपरी पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.