Maval : धर्मवीर संभाजी नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी विनोद टकले, उपाध्यक्षपदी जितेंद्र बोत्रे

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील अग्रगण्य (Maval) पतसंस्था धर्मवीर संभाजी नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी विनोद टकले यांची तर उपाध्यक्षपदी जितेंद्र बोत्रे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

तसेच सचिवपदी संजय शिंदे, खजिनदारपदी सुधीर खांबेटे, तज्ञ संचालकपदी तुकाराम काटे व केशव कुल यांची तसेच संचालकपदी विजय शेटे, दत्तात्रय पिंजण, दत्तात्रय शिंदे, संतोष परदेशी, कैलास चव्हाण, अमर खळदे, किरण किल्लावाला, कल्पना चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

पतसंस्थेचे संस्थापक खंडू टकले यांनी सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी व संचालकांचे अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी सर्व आजी माजी संचालक, पतसंस्थेचे कर्मचारी, दैनंदिन प्रतिनिधी उपस्थित होते.

Railway : रेल्वे पोलिसांनी सात महिन्यात वाचवले 66 लोकांचे प्राण

यावेळी निवडणूक अधिकारी निखारे यांनी केली या प्रसंगी धर्मवीर नागरिक सहकारी पतसंस्थेच्या 2024 वर्षाच्या कॅलेंडरचे प्रकाशन भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या मावळ तालुकाध्यक्ष सायली बोत्रे यांच्या हस्ते करण्यात आले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.