Railway : रेल्वे पोलिसांनी सात महिन्यात वाचवले 66 लोकांचे प्राण

एमपीसी न्यूज – रेल्वे विभागाच्या ‘मिशन जीवन रक्षक’ या अभियानांतर्गत (Railway)रेल्वे पोलिसांनी (आरपीएफ) एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यांच्या कालावधीत 66 नागरिकांचे प्राण वाचवले. त्यात पुणे विभागात 15 जणांचा समावेश आहे. रेल्वेत चढताना अथवा उतरताना निष्काळजीपणा करणाऱ्या प्रवाशांची यामध्ये संख्या अधिक आहे.

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात 19, भुसावळ(Railway) विभागात 13, नागपूर विभागात 14, सोलापूर विभागात 5, पुणे विभागात 15 जणांचा जीव वाचविण्यात आला आहे. रेल्वेमध्ये चढताना अथवा उतरताना निष्काळजीपणा करणारे प्रवासी अनेकदा फलाट आणि रेल्वे यांच्या मध्ये अडकले जातात. काहीजण फलाटावर पडतात. काहींचा फलाट आणि रेल्वेच्या मधल्या सांध्यातून रुळावर पडून मृत्यू होतो.

Pune : गाय दूध विक्रीवरील एमआरपी दर 2 रुपयांनी कमी

काहीजण धावत्या रेल्वेसमोर येऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रकारे नागरिकांची जीवित हानी होऊ नये यासाठी मध्य रेल्वेने मिशन जीवन रक्षक हे अभियान हाती घेतले. जीव वाचवल्या नंतर त्या नागरिकांना पुनर्जन्म झाल्याची अनुभूती होते.

रेल्वे मालमत्तेचे रक्षण करण्यासह आरपीएफकडून ‘अमानत’ ही विशेष मोहीम राबवली जाते. अनेकदा प्रवाशांचे सामान रेल्वे गाडीत अथवा फलाटावर विसरले जाते. असे सामान आरपीएफ ताब्यात घेतले. सामानाची तपासणी करून त्या सामानाच्या मालकाचा शोध घेतला जातो आणि संबंधित व्यक्तीला त्याचे हरवलेले सामान परत केले जाते. कपडे, मोबाईल, लॅपटॉप, दागिने, मौल्यवान वस्तू असे अनेक प्रकारचे साहित्य अजाणतेपणाने राहिलेले असते. ते सामान परत मिळाल्यानंतर प्रवाशांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद असतो.

चालू वर्षात एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत ‘अमानत’ या मोहिमे अंतर्गत आरपीएफने सुमारे 857 प्रवाशांचे दोन कोटी 77 लाख रुपये किमतीचे सामान परत मिळवून दिले. 857 प्रवाशांपैकी 377 प्रवाशांचे एक कोटी 63 लाख रुपयांचे सामान एकट्या मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात परत मिळवण्यात आले. या सामान पुनर्प्राप्ती प्रकरणांमध्ये बॅग, मोबाईल फोन, पर्स, लॅपटॉप आणि इतर मौल्यवान वस्तूंचा समावेश आहे.

भुसावळ विभागात 182 प्रवाशांचे 50 लाख 45 हजार रुपये किमतीचे सामान, नागपूर विभागात 168 प्रवाशांचे 36 लाख 97 हजार रुपये किमतीचे सामान, पुणे विभागात 58 प्रवाशांचे 13 लाख 94 हजार रुपये किमतीचे सामान, सोलापूर विभागात 72 प्रवाशांचे 13 लाख 99 हजार रुपये किमतीचे सामान परत मिळाले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.