Pune : गाय दूध विक्रीवरील एमआरपी दर 2 रुपयांनी कमी

एमपीसी न्यूज – पुणे जिल्हा सहकारी दूध संघाचे गाय दूध विक्री एमआरपी दर 2 रुपयांनी (Pune)कमी करण्यात आले आहे.

संचालक मंडळाच्या सभेत ह निर्णय घेण्यात आला. अध्यक्षस्थानी संघाचे चेअरमन भगवान ज्ञानोबा पासलकर होते. या सभेत पुणे व पिंपरी – चिंचवड शहरातील ग्राहकांचे पसंतीस असलेले गाय दुधापासून निर्मित कात्रज टोनड मिल्क दरामध्ये प्रति लिटर 2 रुपयांनी विक्रीदर ग्राहकांसाठी कमी करण्याचे ठरविण्यात आले आहे.

त्यानुसार दिनांक 1 डिसेंम्बर 2023 पासून (Pune)ग्राहकांना कात्रज 1 लिटर पॅकींगचे टोनड दूध आता रुपये 53 प्रति लिटरमध्ये उपलब्ध होणार आहे. कमी स्निग्ध आणि जास्त प्रोटीन असलेले डबल टोनड 250 मिलीचे दूध ग्राहकांना 12 रुपये दराने उपलब्ध करून दिले जाते. कात्रज डेअरी ग्राहकांना नेहमी स्वच्छ, ताजे आणि भेसळ विरहीत दुधाचा पुरवठा करते.

Chikhali : चिखलीच्या रिव्हर रेसिडेन्सी चौकाजवळ दुकानाला आग

कात्रज दूध संघाचे दूध, दही, ताक, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, मिठाई, तसेच आईस्क्रीम मार्केटमध्ये ग्राहकांसाठी रास्त दारात उपलब्ध आहे. याबरोबरच ज्या दूध संस्था कात्रज पशुखाद्याची दुधाच्या प्रमाणात खरेदी करतील अशा दूध संस्थांना दूध खरेदी दर 1 रुपये वाढवून देण्याचे ठरले आहे, अशी माहिती व्यवस्थापकीय संचालक मनोज लिमये यांनी दिली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.