Maharashtra : राज्यातील शाळांच्या मूल्यांकनासाठी ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान’

एमपीसी न्यूज – राज्यातील शाळांचे मुल्यांकन(Maharashtra) करण्यासाठी ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान’ सुरु करण्यात आले आहे. या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात 478 शाळांचा समावेश असणार आहे.

शाळांमध्ये स्पर्धात्मक वातावरण निर्माण होऊन विद्यार्थ्यांचा (Maharashtra)सर्वांगीण विकास व्हावा तसेच आनंददायी आणि प्रेरणादायी वातावरण मिळावे म्हणून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान राबविण्यास मान्यता राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. बुधवारी (दि. 29) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

Chinchwad : काम करत असलेल्या कंपनीच्या डेटाचा गैरवापर करून स्वतःची कंपनी स्थापन करत केला तब्बल 48 लाखांचा अपहार

या अभियानात पहिल्या टप्प्यात 478 शाळांचा समावेश करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याबरोबरच शिक्षणासाठी आवश्यक आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहन देण्यात येणार आहे. हे अभियान 45 दिवसांमध्ये राबविण्यात येणार आहे. या अभियानातील विविध उपक्रमांसाठी 100 गुण असतील.

मूल्यांकनातून प्रत्येक विभागातून सर्वोत्तम कामगिरी बजावलेल्या शाळांची पहिल्या तीन क्रमांकासाठी निवड करण्यात येणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील तसेच ‘अ’ ‘ब’ वर्ग पालिका क्षेत्रातील शाळांना पहिले पारितोषिक 21 लाख, दुसरे पारितोषिक 11 लाख, तिसरे पारितोषिक 7 लाख मिळेल. तर उर्वरित महाराष्ट्रामधील शाळांना देखील तालुका, जिल्हा तसेच विभाग निहाय पारितोषिके दिली जाणार आहेत. राज्यस्तरावर तसेच सर्व व्यवस्थापनांच्या शाळासाठी पहिले पारितोषिक 51 लाखाचे असून दुसरे पारितोषिक 21 लाख आणि तिसरे 11 लाखाचे असेल. या अभियानासाठी 20 कोटी 63 लाख रुपये खर्च येणार असून त्यासाठी देखील मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.