Bhamboli Phata : दुचाकी व कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – दुचाकी व कारच्या अपघतात दुचाकीस्वाराचा( Bhamboli Phata )मृत्यू झाला आहे. हा अपघात मंगळवारी (दि.28) भांबोली फाटा येथे घडला आहे.

महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात संपत ज्ञानेश्वर पडवळ (वय 38 रा.पडवळवस्ती, खेड) यांनी फिर्याद दिली आहे तर संकेत सुरेश पवार (रा.वासुली फाटा) याच्या विरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

Maharashtra : राज्यातील शाळांच्या मूल्यांकनासाठी ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान’

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, (Bhamboli Phata )आरोपी हा त्याच्या ताब्यातील कार बेदरकारपणे वेगाने चालवत होता. यावेळी त्याने समोरून दुचाकीवरून येणाऱ्या 26 वर्षीय तरुणाला जोरदार धडक दिली यात तो तरुण गंभीर जखमी झाला व यातच त्याचा मृत्यू झाला. यावरून महाळुंगे एमआयडीसी पोलीस पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.