Thergaon: गुटखा विक्री प्रकरणी एकास अटक

एमपीसी न्यूज – शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विक्री करणाऱ्याएका (Thergaon)व्यक्तीला वाकड पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून 51 हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.

कमल बशारत मन्सुरी (वय 38, रा. थेरगाव. मूळ रा. बिहार) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार तात्यासाहेब शिंदे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरनगर थेरगाव येथे (Thergaon)एक व्यक्ती शासनाने प्रतिबंधित केलेला तंबाखूजन्य पदार्थ विकत असल्याची माहिती वाकड पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीच्या घरात बुधवारी (दि. 29) सायंकाळी सव्वा आठ वाजताच्या सुमारास छापा मारला. या कारवाईमध्ये पोलिसांनी ५१ हजार 897 रुपये किमतीचा तंबाखूजन्य पदार्थ जप्त केला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.