Chinchwad Bye Election: काँग्रेसचे प्रदेश सचिव सचिन साठे भाजपमध्ये

एमपीसी न्यूज – चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या (Chinchwad Bye-Election) प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. पिंपरी-चिंचवड काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष तथा प्रदेश सचिव सचिन साठे यांनी गुरूवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. साठे यांच्या प्रवेशामुळे भाजपची ताकद वाढली आहे.

सचिन साठे हे 1997 पासून अर्थात विद्यार्थी दशेपासून काँग्रेस पक्षाचे काम करत होते.  एनएसयूआयचा जिल्हाध्यक्ष, प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्षपदावर काम केले.

2014 ते 2020 या साडे सहा वर्षांच्या कालावधीत पिंपरी-चिंचवड काँग्रेसचे शहराध्यक्षपद भूषवले. अनेक राज्यांमध्ये काँग्रेसचा निरीक्षक म्हणून काम केले.

दोन दिवसांपूर्वी त्यांनी प्रदेश सचिवपदाचा राजीनामा दिला होता. त्यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

Pune Crime : आयुक्त शैलाजा दाराडे यांच्यावर गुन्हा दाखल; नोकरी लावण्याच्या आमिषाने 45 जणांची फसवणूक

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.