Chinchwad Bye-Election : बंडखोरीमुळे चिंचवडमध्ये अपयश, अजितदादांनी केला पराभव मान्य

एमपीसी न्यूज – चिंचवडमध्ये राहुल कलाटे आणि नाना काटे यांची मते बघितली. तर ती भाजप उमेदवारापेक्षा किती तरी जास्त आहेत. (Chinchwad Bye-Election) बंडखोरी झाली नसती तर आमचा उमेदवार विजयी झाला असता. बंडखोरीमुळे चिंचवडमध्ये अपयश आल्याचे सांगत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आपला पराभव मान्य केला आहे.

Ravindra Dhangekar : आजचा विजय हा जनतेचा ; रवींद्र धंगेकर यांची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया

राहुल कलाटे यांना बराच सांगण्याचा प्रयत्न केला. जरा थांब पण माझ्या आवाहानाला त्याने प्रतिसाद दिला नाही. राहुल यांचा अर्ज माघारी निघू नये यासाठी फार मोठे प्रयत्न केले. त्याला राज्यकर्त्यांनी सगळ्या प्रकारच्या सहकार्य केले. तरीही राहुल आणि नाना काटेची मते बघितली. तर, ती भाजप उमेदवारापेक्षा किती तरी जास्त आहेत.

टफ फाईट देण्याचा प्रयत्न केला. निवडणूक उशीरा झाली असती तर काही तरी मतांनी नाना काटे विजयी झाले असते, असेही पवार म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.