Chinchwad : कार्यकर्ताही पक्षाचे नेतृत्व करू शकतो हा नवा संदेश मुख्यमंत्र्यांनी दिला – पंकजा मुंडे

एमपीसी न्यूज : शिवसेना पक्षाच्या निवडणूक चिन्ह (Chinchwad) धनुष्यबाणावर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. यावर अनेक प्रकारच्या राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. आता भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे यांनीही प्रतिक्रिया देत या प्रकरणावर आपली बाजू मांडली आहे. चिंचवड भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांच्या प्रचारार्थ पंकजा मुंडे यांनी सोमवारी पत्रकारांशी संवाद साधताना आपली भूमिका स्पष्ट केली.

पंकजा मुंडे म्हणाल्या की, या सर्व राजकीय परिस्थितीबद्दल मला नेहमीच उत्सुकता असते. या सर्वांशी माझे अतिशय वैयक्तिक आणि जवळचे नाते आहे. पण, मी सांगू इच्छिते की सध्याचा काळ हा सर्वां साठीच कठीण काळ आहे. कार्यकर्ताही पक्षाचे नेतृत्व करू शकतो हा नवा संदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या.

Chinchwad News : खासदार श्रीरंग बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त शरीरसौष्ठव स्पर्धा; ‘महाराष्ट्र श्री 2023’चा सौरभ हिरवे मानकरी

हा संदेश यशस्वी करण्याची आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या (Chinchwad) सर्व लोकांना निवडण्याची संधी मिळाली आहे. त्यांना सत्तेच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली आहे.

पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या की, दुसरीकडे शिवसेना पक्षासाठी नाव नसताना उद्धव ठाकरे यांच्यासमोर पक्षबांधणीचे मोठे आव्हान आहे. ते त्या प्रश्नांची उत्तरे शोधतील आणि पुढे जातील. दरम्यान, पत्रकारानी बहीण या नात्याने उद्धव ठाकरेंशी तुम्ही बोललात का? असा प्रश्न विचारला असता, पंकजा मुंडेंनी सांगितले, की मला एक बहीण म्हणून जे बोलायचं आहे ते मी तुमच्यासमोर का बोलू? तसेच उद्धव ठाकरेंना सल्ला देण्याचे माझे वय नाही. मी सगळ्यांची धाकटी बहीण आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.