Chinchwad : सामुदायिक तुळशी विवाह सोहळा

एमपीसी न्यूज – चिंचवड, शिवतेजनगर येथील श्री स्वामी स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानच्या वतीने श्री स्वामी समर्थ मंदिर येथे सामुदायिक तुलसी विवाह करण्यात आला. याप्रसंगी परिसरातील 15 ते 20 कुटुंबानी आपल्या घरातील तुळशी सजवून आणल्या होत्या. तुलसी विवाह निर्मल गुरुजी यांच्या उपस्थिती मध्ये पार पडला.

हा तुळशी विवाह पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थिती लावली होती. विवाह लागल्यानंतर फटाके फोडण्यात आले तसेच सर्वांना लाडूचा प्रसाद देण्यात आला.

यावेळी श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे, प्रा. हरिनारायण शेळके, संतोष शेळके, मंगेश पाटील,अशोक खडके, कैलास मुळे, अर्चना तोंडकर, अंजली देव, नीलिमा भंगाळे प्रीती झोपे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजाराम सावंत यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.