Chinchwad : व्यावसायिक इमारतीमधील मीटर बॉक्‍सला आग

एमपीसी न्यूज – चिंचवडगाव येथील एका व्यावसायिक (Chinchwad) इमारतीमधील मीटर बॉक्‍सला आग लागली. ही घटना सोमवारी (दि. 11) दुपारी पावणे दहा वाजताच्या सुमारास चापेकर चौकातील कुणाल मार्केटमध्ये घडली.

Sangvi : नदीत उडी मारून एकाची आत्महत्या

अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी 9.51 वाजताच्या सुमारास चापेकर चौक, चिंचवडगाव येथील कुणाल मार्केट या इमारतीमधील मिटर बॉक्‍सला आग लागल्याची वर्दी विजय गायकवाड यांनी पिंपरी चिंचवड अग्निशमन विभागाला दिली. त्यानुसार अग्निशमन दलाचा एक बंब घटनास्थळी दाखल झाला. जवानांनी त्वरीत आग विझविली.
या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. या व्यावसायिक इमारतीमध्ये अनेक दुकाने असल्याने नागरिकांचा सतत इथे राबता असतो. सणासुदीच्या काळात खरेदीसाठी या ठिकाणी गर्दी असते. अचानक लागलेल्या या आगीच्या घटनेमुळे एकच खळबळ (Chinchwad) उडाली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.