Chinchwad : सोसायटीमधील मीटर बॉक्सला आग

एमपीसी न्यूज – सोसायटी मधील इलेक्ट्रिक मीटरच्या बॉक्सला आग लागल्याची घटना शुक्रवारी (दि. 22) पहाटे चिंचवडमधील (Chinchwad) प्रेमलोक पार्क येथे घडली.

Startup :स्टार्टअपच्या यशस्वीतेसाठी सूर्यदत्त संस्था करणार कायमस्वरूपी मार्गदर्शन

अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सुमेध पानसे यांनी प्रेमलोक पार्क, चिंचवड येथील इमारतीमधील मीटरच्या बॉक्‍सला आग लागल्याची शुक्रवारी पहाटे वर्दी दिली. त्यानुसार प्राधिकरण अग्निशामक उपकेंद्राचा बंब घटनास्थळी दाखल झाला. मात्र त्यापूर्वीच रहिवाशांनी मातीचा वापर करीत आगीवर नियंत्रण मिळवले होते. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

अपघातग्रस्त कार मधील ऑईल सांडले
निगडी येथे एका कारचा अपघात झाला. अपघातामुळे कारमादिह्ल ऑईल रस्त्यावर सांडले. या ऑईल वरून घसरून अनेक अपघात होण्याचा धोका होता. याबाबत अग्निशमन विभागाला माहिती मिळाली असता अग्निशमन विभागाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत ऑइल सांडलेल्या ठिकाणी भूसा टाकून ऑईल झाकले. यामुळे वाहतूक सुरळीत होऊन अपघाताचा धोका टळला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.