BNR-HDR-TOP-Mobile

Chinchwad: जागतिक अंपगदिनानिमित्त दिव्यांग मतदारांचा सत्कार

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – जागतिक अंपग दिनानिमित्त चिंचवड विधानसभा मतदार संघातील दिव्यांग मतदारांचा सत्कार करण्यात आला. गुलाब पुष्प देऊन दिव्यांग मतदारांचे स्वागत करण्यात आले.  

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहात झालेल्या कार्यक्रमाला सभागृह नेते एकनाथ पवार, आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, नगरसेविका हिराबाई घुले, नीता पाडाळे, सहायक मतदार नोंदणी अधिकारी राधिका हावळ, नायब तहसिलदार उषा ठोंबरे, दिपक कन्हेरे, सोपान खोसे, अनिल जगताप, हरिभाऊ साबळे उपस्थित होते.

भारत निवडणूक आयोगामार्फत मतदार याद्यांच्या विशेष पुर्नरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. जागतिक अपंग दिनाच्या दिवशी दिव्यांग मतदारांचा शोध घेऊन त्यांचा सत्कार करण्याचे निर्देश आयोगाने दिले होते. त्यानुसार 205 चिंचवड विधानसभा मतदार संघातील दिव्यांग मतदारांचा सत्कार करण्यात आला.

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मतदारांनी आपला हक्क बजवावा. दिव्यांग नागरिकांनी मतदार यादीमध्ये नाव नोंदवावे, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त तथा मतदार नोंदणी अधिकारी दिलीप गावडे यांनी केले.

HB_POST_END_FTR-A4

.