Chinchwad : रिदमीक जिमनॅस्टिक स्पर्धेत हेवन स्पोर्टस क्लबच्या खेळाडूंचे यश

एमपीसी न्यूज- अमरावती येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या रिदमीक जिमनॅस्टिक स्पर्धेत हेवन स्पोर्टस क्लबच्या ८ वर्ष वयोगटातील अनवी पाटील व 10 वर्ष वयोगटातील अनन्या देव या दोन खेळाडूंनी रोप या प्रकारात रौप्यपदक पटकावले. या स्पर्धेत पिंपरी चिंचवडमधील 17 खेळाडुंनी भाग घेतला होता.

मागील वर्षी हैदराबाद येथे झालेल्या स्पर्धेत अनन्याला कांस्यपदक मिळाले होते तर अनवीला जिल्हास्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळाले होते. हर्षद कुलकर्णी व धनश्री देशपांडे यांनी तिला मार्गदर्शन केले. खेळाचा दर्जा वाढविण्यासाठी अजुन अध्याधुनिक प्रशिक्षण तंत्र व हॉलची आवश्यकता आहे ही खंत हर्षद कुलकर्णी यांनी मांडली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.