Chinchwad news: मुदत संपलेल्या बिजलीनगर गुरुद्वारा चौक अंडरपासचे काम त्वरित पूर्ण करा – मयुर जयस्वाल

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने करण्यात येत असलेल्या बिजलीनगर गुरुद्वाराचौकातील अंडरपासच्या कामाची मुदत संपली आहे. मुदतीत काम पूर्ण झाले नाही. अर्धवट असलेले हे काम संथगतीने सुरु आहे. याचा नागरिकांना नाहक त्रास होत आहे. पुलाचे काम त्वरित पूर्ण करावे;अन्यथा युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस मयुर जयस्वाल यांनी दिला आहे.

याबाबत पालिकेच्या ‘ब’ प्रभागाचे अधिकारी प्रशांत जोशी यांना निवेदन देण्यात आले. या प्रसंगी सेवादल अध्यक्ष मकरध्वज यादव, युवक काँग्रेसचे विशाल कसबे, स्वप्नील शिंदे उपस्थित होते.

सन 2018 पासून प्रभाग क्रमांक 20 येथील बिजलीनगर ते गुरुद्वारा चौक अंडरपासचे काम सुरू असून आद्यप ते अर्धवट स्थिती मध्ये आहे. स्थायी समितीच्या आदेशानुसार काम संपुर्ण करण्याची काल मर्यादा मार्च 2020 होती.

परंतु हे काम  अद्याप  50% देखील पूर्ण झालेले नाही. गेली दोन वर्षे निगडी-प्राधिकरण- रावेतला जोडणारा मुख्य रस्ता या कामानिमित्त वाहतूकीसाठी बंद आहे.

नागरिकांना पर्यायी म्हणून गल्लीबोळातून वाहतूक करावी लागत आहे. त्यामुळे अनेक छोटे मोठे अपघात होतात व वाद विवाद निर्माण होतात.

हा मुख्य रास्ता बंद असल्याने पीएमपीएल बससेवा बंद असून, कामगारांच्या कंपनी बससेवा, मुलांची शाळेची बससेवा या मार्गावर बंद आहेत. तसेच या रस्त्यालगत असणारे छोटे-मोठे दुकानदार व व्यापारी यांचे व्यवसाय पूर्णपणे बंद पडले आहेत.

करदात्यांचे करोडो रुपये खर्च करून या अंडरपास ( सबवे) ची गरज काय, हा सवाल नागरिक विचारीत आहेत. संथगतीने चालणाऱ्या या कामाच्या विरोधात नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. अंडरपासचे काम त्वरित पूर्ण करण्यात यावे; अन्यथा युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.