Sangvi crime News : व्यवसायासाठी माहेरहून 20 लाख रुपये आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ

पैसे दिले नाहीत तर बघून घेण्याची धमकी देत विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

एमपीसी न्यूज – व्यवसायासाठी माहेरहून 20 लाख रुपये आणण्याची मागणी करत सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ केल्याबाबत सांगवी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमित अशोक कपूर (वय 37), अशोक प्रेमनाथ कपूर (वय 72, दोघे रा. पिंपळे सौदागर), शीतल निनाद ताकपेरे (वय 40, रा. कांदिवली इस्ट, मुंबई) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पिडीत विवाहितेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विवाहितेचा विवाह नोव्हेंबर 2010 मध्ये झाला होता. तेंव्हापासून आरोपींनी आपसात संगनमत करून विवाहितेला शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. तसेच पतीच्या व्यवसायासाठी माहेरहून 20 लाख रुपये आणण्याची मागणी केली.

पैसे दिले नाहीत तर बघून घेण्याची धमकी देत विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.