Chinchwad News: खानदेश मराठा पाटील समाज संघातर्फे दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड खानदेश मराठा पाटील समाज संघाच्यावतीने खान्देशातून पिंपरी-चिंचवड शहरात स्थायीक झालेल्या नागरिकांच्या दहावी-बारावीतील गुणवंत पाल्यांचा गौरव केला.

बिजलीनगर याठिकाणी रविवारी (दि.4) हा गुणगौरव सोहळा पार पडला. सत्तारूढ पक्षनेता नामदेव ढाके प्रमुख उपस्थित होते. विद्यार्थी एक प्रेरणादायी व हुशार होतकरू अभ्यासू संशोधक वृत्तीचा असावा.

विद्यार्थ्यांनी अभ्यासात खूप मेहनत घेऊन आपल्या पालकांचे नाव मोठे करावे व स्वतःही सक्षम व्हावे, असे मत ढाके यांनी व्यक्त करत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी मंडळाचे संचालक उद्योजक शरद पाटील, पंकज निकम, मोतीलाल भामरे, शंकर पाटील, शिवाजी पाटील, महेंद्र पाटील, प्रल्‍हाद पाटील, कुवर सर, देविदास पाटील, सुनील मराठे, जगदीश पाटील, किशोर पाटील, प्रवीण पाटील, रवींद्र पाटील, विनोद बच्छाव, संदीप पाटील, विजय पाटील, अधिकारी पाटील, देवेंद्र पाटील, वासुदेव पाटील, बाबाजी देसले, भानुदास पाटील आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता फक्त दहा विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. मंडळाकडे 47 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली असून उर्वरित विद्यार्थ्यांना घरी जाऊन सत्कार करण्यात येईल, अशी माहिती खानदेश मराठा पाटील समाज संघाचे अध्यक्ष महेंद्र पाटील यांनी दिली.

श्रुती रवींद्र भदाने (94 टक्के), उत्कर्षा भाऊसाहेब पाटील (93 टक्के), हिमांगी महेंद्र पाटील (92 टक्के), शिवाजी जगदीश पाटील (91टक्के), भावेश रामचंद्र पाटील (87 टक्के), यश किशोर पाटील (86 टक्के), जय ज्ञानेश्वर पाटील, रोहित अधिकार पाटील (85 टक्के), हर्षाली संजय सूर्यवंशी (84 टक्के), वैष्णवी ज्ञानेश्वर पवार (83 टक्के) या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

सूत्रसंचालन व आभार शंकर पाटील यांनी मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.