Hinjawadi Crime News : सामाजिक सुरक्षा पथकाचा जुगार अड्ड्यावर छापा

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाने सावकार चौक, मारूंजी येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा घातला. यामध्ये जागा मालकासह जुगार खेळणाऱ्या 24 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी एक लाख 33 हजार 760 रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे.

अविनाश बुचडे (वय 27, रा. मारूंजी) याच्यासह 24 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सामाजिक सुरक्षा पथकातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मारूंजी येथील सावकार चौकात असलेल्या पाण्याच्या टाकीजवळील पत्र्याच्या शेडमध्ये जुगार सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागास मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला. यावेळी जुगार खेळत असलेल्या 23 जणांवर पोलिसांनी कारवाई करीत गुन्हा दाखल केला.

तसेच जागेचा मालक अविनाश बुचडे याच्यावरही गुन्हा दाखल केला. पोलिसांनी या जुगार अड्ड्यावरून एक लाख 28 हजार 760 रुपयांची रोकड, पाच हजार रुपयांचे जुगाराचे साहित्य, एक मोबाईल फोन असा एकूण एक लाख 33 हजार 760 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

ही कारवाई पोलीस आयुक्‍त कृष्ण प्रकाश, उपायुक्‍त सुधीर हिरेमठ, सहायक आयुक्‍त आर. आर. पाटील, वरिष्ठ निरीक्षक विठ्ठल कुबडे, प्रसाद गोकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अशोक डोंगरे, कर्मचारी विजय कांबळे, सुनील शिरसाट, भगवंता मुठे, अनिल महाजन, वैष्णवी गावडे, मारूती करचुंडे, गणेश कारोटे, योगेश तिडके, राजेश कोकाटे यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.