Chinchwad : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने शहरात 22 ठिकाणी विजयादशमी उत्सवाचे आयोजन

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे (Chinchwad) पिंपरी-चिंचवड शहरात विजयादशमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त शहरातील 22 ठिकाणी विविध वक्त्यांची व्याख्याने होणार आहेत.

शनिवारी (दि. 21) संभाजीनगर भागात, रविवारी (दि. 22) शहरातील 20 ठिकाणी तर शनिवारी (दि. 28) हिंजवडी येथे विजयादशमी उत्सव व्याख्यानाच्या माध्यमातून साजरा केला जाणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे दरवर्षी विजयादशमी उत्सवाचे आयोजन केले जाते. यावर्षी पिंपरी चिंचवड शहरातील 22 विविध भागात मोठ्या संख्येने स्वयंसेवक, नागरिक या उत्सवात सहभागी होणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.

संभाजीनगर, देहूरोड, देहूगाव, निगडी, चिखली, पिंपळे सौदागर, पिंपळे निलख, काळेवाडी, पिंपरी, चिंचवड पूर्व, चिंचवड (Chinchwad) पश्चिम, रावेत, आकुर्डी, वाकड, पुनावळे, थेरगाव, हिंजवडी, इंद्रायणीनगर, दिघी, भोसरी, चऱ्होली, आळंदी, संत तुकाराम नगर, कासारवाडी, पिंपळे गुरव, सांगवी आदी ठिकाणी कार्यक्रम (Chinchwad) होणार आहेत.

Wakad : दुभाजकाला धडकून रिक्षा चालकाचा मृत्यू

या वेळी शारीरिक प्रात्यक्षिके, घोष (बँड) वादन, राष्ट्रभक्तीपर गीते या सामूहिक कार्यक्रमांसह पारंपरिक शस्त्रपूजन झाल्यानंतर वक्त्यांचे मार्गदर्शन होणार आहे. विविध क्षेत्रांतील मान्यवर प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर विजयादशमी दिवशी शहरातील विविध भागात पथसंचलन होणार आहे. याबाबतची माहिती पिंपरी चिंचवड जिल्हा संघचालक विनोद बन्सल यांनी दिली आहे.

कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे –
संभाजी नगर
वक्ते – राहुल सोलापूरकर
प्रमुख पाहुणे – वसंत अवसरिकर
स्थान – पं दीनदयाळ उपाध्याय मैदान पूर्णानगर
दि. – शनिवार, 21 ऑक्टोबर
वेळ सायं 05.00 वा.
देहूरोड
वक्ते – सचिन ढोबळे
प्रमुख पाहुणे – भरत तरस
स्थान – मुकाई देवी मंदिर समोरील मैदान, मुकाई चौक, किवळे
दि. – रविवार, 22 ऑक्टोबर
वेळ – सायंकाळी 04.30 वा.
देहूगाव
वक्ते – सोपान मेकले
स्थान – कदजाई मंदिर सांगुर्डी
दि. – रविवार, 22 ऑक्टोबर
वेळ – सायंकाळी 05:30 वा.
निगडी
वक्ते – सागर नाझरकर
प्रमुख पाहुणे – शरद काळभोर
स्थान – प्रबोधनकार ठाकरे क्रीडांगण यमुनानगर
दि. – रविवार, 22 ऑक्टोबर
वेळ – सायंकाळी 06.00 वा.
चिखली
वक्ते – निलेश गद्रे
स्थान – गुरुवर्य अकादमी प्रशाला गणेश नगर चिखली
दि.- रविवार, 22ऑक्टोबर
वेळ – सकाळी 08:30 वा.
पिंपळे सौदागर
वक्ते – हेमंत हरहरे
प्रमुख पाहुणे – प्रियांका अग्रहारी
स्थान – पि. के. इंटरनॅशनल स्कूल, पिंपळे सौदागर.
दि. – रविवार, 22 ऑक्टोबर
वेळ – सायं. 05:30 वाजता
पिंपळे निलख
वक्ते – चंद्रशेखर पाठक
प्रमुख पाहुणे – डॉ. अंजली देशपांडे
स्थान – चोंधे पाटील स्पोर्ट कॉम्प्लेक्स, विशाल नगर पिंपळे निलख
दि. रविवार, 22 ऑक्टोबर
वेळ – सायं 05:30 वा.
काळेवाडी
वक्ते – उपेंद्र हुंडेकरी
प्रमुख पाहुणे – विष्णू तांबे
स्थान – बेबिज इंग्लिश मिडीयम स्कूल, काळेवाडी
दि. – रविवार, 22 ऑक्टोबर
वेळ – सायं 05.00 वाजता
पिंपरी
वक्ते – जयंत जाधव
स्थान – आर्य समाज विद्यामंदिर पिंपरी कॅम्प.
दि. – रविवार, 22 ऑक्टोबर
वेळ :- सकाळी 07.30 वा.
चिंचवड पूर्व
वक्ते – दिलीप कंद
प्रमुख पाहुणे – हेरंब चैनी
स्थान – दर्शन अकादमी शाळा चिंचवड
दि. – रविवार, 22 ऑक्टोबर
वेळ – सायं 06.00 वा.
चिंचवड पश्चिम
वक्ते – रविंद्र आलोने
प्रमुख पाहुणे – डॉ. विद्याधर कुंभार
स्थान – देऊळमळा पटांगण, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड

दि. – रविवार, 22 ऑक्टोबर
वेळ – सायं 06.00 वाजता
हिंजवडी गट
रावेत
वक्ते – केदार तापीकर
प्रमुख अतिथी – हशमत सिंह
स्थान – वाहनतळ, इस्कॉन मंदिर, रावेत
दि. – रविवार, 22 ऑक्टोबर
वेळ – सायं 05.00 वा.
आकुर्डी
वक्ते – मंगेश बडवे
स्थान – महादेव मंदिर, सेक्टर 28, प्राधिकरण
दि. – रविवार, 22 ऑक्टोबर
वेळ – सायं 05.30 वाजता
वाकड
वक्ते – सुनील साठे
प्रमुख पाहुणे – सुधाकर दिवाण
स्थान – एक्झीबिशन मैदान वाकड
दि. – रविवार, 22 ऑक्टोबर
वेळ – सायं 05.30 वाजता
पुनावळे
वक्ते -निखिल मोहोळकर
प्रमुख पाहुणे – चारुदत्त बोधनकर
स्थान – विठ्ठल मंदिर, जांबे
दि. – रविवार, 22 ऑक्टोबर
वेळ – सायं 05.00 वाजता
थेरगाव
वक्ते – श्रीनिवास पुलय्या
स्थान – मोरू महादू बारणे क्रीडांगण, वनदेवी, थेरगाव फाटा
दि. – रविवार, 22 ऑक्टोबर
वेळ – सायं 05.00 वा.
हिंजवडी
वक्ते – निलेश क्षीरसागर
स्थान – पीएमआरडीए फायर स्टेशन जवळचे मैदान, लाईफ रिपब्लिक,मारुंजी
दि. – शनिवार, 28 ऑक्टोबर
वेळ – सायं 05.30 वा.
आळंदी (इंद्रायणीनगर, दिघी, भोसरी, चऱ्होली, आळंदी)
वक्ते – निलेशजी गद्रे
प्रमुख अतिथी – ह.भ.प.डॉ. यशोधन महाराज साखरे
स्थान – श्री स्वामी समर्थ विद्यामंदिर सेक्टर २ इंद्रायणी नगर
दि. – रविवार, 22 ऑक्टोबर
वेळ – सायं 05.30 वाजता
सांगवी गट
संत तुकाराम नगर
वक्ते – सारंग पापळकर
स्थान – डॉ. हेडगेवार क्रिडा संकुल
दि. – रविवार, 22 ऑक्टोबर
वेळ – सायं.06.00 वाजता
कासारवाडी
वक्ते – सौरभ वायगावकर
स्थान – ज्ञानराज विद्यालय, कासारवाडी
दि. – रविवार, 22 ऑक्टोबर
वेळ – सायं.06.00 वाजता
पिंपळे गुरव
वक्ते – अतुल अग्निहोत्री
स्थान – मनपा शाळा मैदान,
पिंपळे गुरव
दि. – रविवार, 22 ऑक्टोबर
वेळ – सायं. 06.00 वा.
सांगवी
वक्ते – गोविंद जेस्ते
प्रमुख पाहुणे – रजनीकांत पतंगे
स्थान – विनायक हार्डवेअर शेजारील मैदान, पी डब्लू डी कॉलनी रोड, आनंदनगर, सांगवी
दि. – रविवार, 22 ऑक्टोबर
वेळ – सायं.06.30 वा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.