Thergaon : गळफास घेऊन मजुराची आत्महत्या

एमपीसी न्यूज – राहत्या घरात गळफास (Thergaon )घेऊन मजुराने आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (दि. 19) रात्री थेरगाव येथे घडली.

बालाजी लक्ष्मण सावंत (वय 44, रा. सदाशिव कॉलनी, पद्‌मजी पेपर मिलसमोर, थेरगाव) असे आत्महत्या केलेल्या व्यक्‍तीचे नाव आहे.

Chinchwad : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने शहरात 22 ठिकाणी विजयादशमी उत्सवाचे आयोजन

मिळालेल्या माहितीनुसार, बालाजी सावंत हे पेंटींग आणि वेल्डींगचे काम करीत होते. गुरुवारी रात्री पावणे दहा वाजताच्या (Thergaon ) सुमारास त्यांनी राहत्या घरात लोखंडी अँगलला नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.