PMPML : पीएमपीएमएल झाले अपग्रेड; कर्मचाऱ्यांची हजेरी आता ‘Location Base क्युआर कोड’द्वारे होणार

एमपीसी न्यूज : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (PMPML) सक्षमीकरणासाठी परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सचिन्द्र प्रताप सिंह यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हातात घेतल्यापासून अनेक उपाययोजना व अभिनव उपक्रम यशस्वीपणे राबविलेले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आता पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांची आता ‘Location Base क्युआर कोड’ द्वारे हजेरी घेतली जाणार आहे.

अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सचिन्द्र प्रताप सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली सेवकांनी व अधिकाऱ्यांनी आपल्या कामाच्या ठिकाणी नेमून दिलेल्या वेळेतच उपस्थित राहून महामंडळाच्या कामकाजाच्या सोईच्या दृष्ठीने, प्रवाशांना योग्य व खात्रीशीर सेवा देण्याच्या दृष्ठीकोनातून ‘Location Base क्युआर कोड’ द्वारे हजेरीची नोंद महामंडळाच्या सर्व कार्यालये व डेपोमध्ये सुरु करण्यात आली आहे.

Thergaon : गळफास घेऊन मजुराची आत्महत्या

महामंडळाने कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी तयार केलेल्या ‘RTMS कार्गो एफएल’ मोबाईल अॅप मध्ये महामंडळातील (PMPML) सर्व सेवक व अधिकारी यांनी कामावर हजर होते वेळी दैनिक हजेरी या सदराखाली कामावर येण्याचा वेळेस व कामाची सुट्टी झाल्यावर जाण्याच्या वेळेस सर्व कार्यालयाच्या व सर्व डेपोच्या प्रवेशद्वारावर बसवण्यात आलेले ‘Location Base क्युआर कोड’ स्कॅन करून उपस्थितीची नोंद करावयाची आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.