Talegaon Dabhade : गोडाऊन मधून 56 हजारांची भांडी चोरीला; आरोपीला अटक

एमपीसी न्यूज – भांड्याच्या गोडाऊनमध्ये (Talegaon Dabhade) चोरी करत चोरट्याने 56 हजार रुपयांची भांडी चोरून नेली. ही घटना 17 ऑक्टोबर रोजी रात्री ते 18 ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजताच्या कालावधीत संभाजीनगर गोडाऊन, तळेगाव दाभाडे येथे घडली. पोलिसांनी चोरट्याला अटक केली आहे.

शिवा अयप्पा नाटेकर (वय 20, रा. जुनी सांगवी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी ललित मंगीलाल ओसवाल (वय 48, रा. तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

PMPML : पीएमपीएमएल झाले अपग्रेड; कर्मचाऱ्यांची हजेरी आता ‘Location Base क्युआर कोड’द्वारे होणार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ओसवाल हे भांड्याची खरेदी विक्री करतात. त्यांचे तळेगाव दाभाडे येथे भांड्याचे (Talegaon Dabhade) गोडाऊन आहे. एका चोरट्याने त्यांच्या गोडाऊनच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. गोडाऊन मधून तांब्या, पितळ आणि इतर धातूची एकूण 56 हजार 400 रुपये किमतीची भांडी चोरून नेली. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.