Maharashtra : जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी युरोप येथे दिनेश गुंड यांची निवड

एमपीसी न्यूज : जागतिक कुस्ती संघटनेच्या (Maharashtra) वतीने अल्बेनिया ( युरोप ) येथे दिनांक 22 ते 28 ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय कुस्ती संघटनेच्या वतीने प्रा. दिनेश गुंड यांची तांत्रिक अधिकारी म्हणून निवड करण्यात आली.

दिनेश गुंड हे जागतिक कुस्ती संघटनेचे प्रथम श्रेणीचे पंच असून त्यांनी आजपर्यंत अनेक जागतिक, आशियाई, ऑलम्पिक पात्रता, विश्वचषक स्पर्धेत तांत्रिक अधिकारी म्हणून काम केले आहे .

दिनेश गुंड हे आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच तसेच आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक म्हणून प्रचलित आहेत. महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रात त्यांचे खूप  मोलाचे योगदान आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांची ही 56 वी आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. अशी कामगिरी करणारे ते महाराष्ट्रातील एकमेव पंच आहेत.

Talegaon Dabhade : गोडाऊन मधून 56 हजारांची भांडी चोरीला; आरोपीला अटक

त्यांनी आतापर्यंत 125 राष्ट्रीय, 56 आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तांत्रिक अधिकारी म्हणून काम पाहिले असून असे कार्य करणारे ते  पहिले (Maharashtra) महाराष्ट्रीयन आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.