Wakad : दुभाजकाला धडकून रिक्षा चालकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – रस्ता दुभाजकाला धडकून रिक्षा चालकाला मृत्यू (Wakad) झाला. ही घटना काळेवाडी फाटा येथे घडली. परमेश्‍वर आत्माराम कांबळे (वय 20, रा. भूजबळ चौक, वाकड) असे मृत्यू झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे.

परमेश्‍वर हे गुरुवारी (दि. 19) रात्री सव्वा अकरा वाजताच्या सुमारास जगताप डेअरीकडून काळेवाडी फाट्याच्या दिशेने येत होते. काळेवाडी पुलाच्या खाली पार्क स्ट्रीट सोसायटी समोर त्यांची रिक्षा रस्ता दुभाजकाला धडकली.

Pune : रोहित्रांच्या ठिकाणी वीज सुरक्षेसाठी फायबर प्लस्टिकचे संरक्षक कुंपण

या अपघातात गंभीर जखमी झालेल्या परमेश्‍वर यांना थेरगाव रुग्णालयात दाखल केले. मध्यरात्री सव्वाएक वाजताच्या सुमारास (Wakad) त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.