Chinchwad : संभाजीनगरमध्ये महिलांसाठी मोफत पाक कला प्रशिक्षणाचे आयोजन

एमपीसी न्यूज – देशाचे लोकप्रिय पंतप्रधान (Chinchwad )नरेंद्र मोदी यांचा लोकप्रिय ठरलेला कार्यक्रम “मन की बात” च्या 100 व्या प्रसारण भागा निमित्त  महिलांसाठी मोफत पाक कला प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.

भाजपा प्रदेश सचिव अमित गोरखे  आणि माजी नगरसेविका अनुराधा गोरखे यांच्या वतीने रविवार 30 एप्रिल 2023 रोजी सकाळी 9 ते 11 या वेळेत संभाजीनगर येतील नोव्हेल स्कूलच्या हॉलमध्ये हे प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. यामध्ये ब्राऊन ग्रेव्ही – व्हेज भूना, टोमॅटो ग्रेव्ही – पनीर बटर मसाला, व्हाईट ग्रेव्ही – मेथी मटर मलाई आणि इतर पदार्थांविषयी मोफत पाक कला प्रशिक्षण दिले जाईल.

या प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी महिलांनी नावनोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी नावनोंदणीसाठी 8446616198 व 7517505533 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजक अमित गोरखे व अनुराधा गोरखे यांनी (Chinchwad ) केले आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.