Chinchwad : चिंचवडला आज रंगणार ‘महाशून्यचा’ प्रयोग

कर्नाटक येथील राष्ट्रीय नाट्य महोत्सवात ‘महाशून्यची’ निवड

एमपीसी न्यूज – साऊथ झोन कल्चरल सेंटर, तंजावर द्वारा आयोजित ‘राष्ट्रीय नाट्य महोत्सव 2019’ साठी ‘महाशून्य’या थिएटर वर्कशॉप कंपनीच्या नाटकाची निवड झाली आहे. जानेवारी महिन्यात या नाटकाचा प्रयोग कर्नाटक मधील हुलियार येथे होणार आहे.  खास पिंपरी चिंचवडकरांकरिता चिंचवडच्या प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आज रविवारी(30 डिसेंबर) रात्री साडे नऊ वाजता या नाटकाचा प्रयोग रंगणार आहे.  

नुकत्याच महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत ‘महाशून्य’ नाटकाचा प्रयोग झाला  त्याला प्रेक्षकांची वाहवा मिळाली. कोकणातील दशावतारी कला सादर करणा-या कलाकारांचा  जगण्याचा संघर्ष आणि दशावतारी कला लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न वेगळ्या धाटणीतून या नाटकामधून मांडला आहे. या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रभाकर पवार यांनी केले आहे. एकूण 22 कलाकारांचा रंगमंचीय अविष्कार, हुबेहुब कोकण वाटावे असे नेपथ्य, तबला – पेटी सारख्या पारंपरिक वाद्यांची संगीत साथ, रंगमंचावर घडणारा दशावतार या सगळ्यांची मजा प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.

                                                                     

या प्रयोगाकरिता पिंपरी चिंचवडमधील सर्व ज्येष्ठ नागरिक संघ, स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे सभासद, तसेच सातारा जिल्हा मित्र मंडळाचे सदस्य यांना प्रवेश शुल्कात सवलत देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी  9970051471,8669220612 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन थिएटर वर्कशॉप कंपनीच्या वतीने करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.