Chinchwad : महाराष्ट्र सौंदर्यसम्राज्ञी स्पर्धेमध्ये सौभाग्यवती गटात गौरी थोरात तर कुमारी गटामध्ये डॉ. योगिनी घुटके प्रथम

एमपीसी न्यूज- एकमेव अस्सल मराठमोळी संकल्पना असलेली खान्देश अहिराणी कस्तुरी, साहित्य सांस्कृतिक कला क्रीडा मंच महाराष्ट्र राज्य आयोजित राज्यस्तरीय महाराष्ट्र सौंदर्यसम्राज्ञी स्पर्धेचा महाअंतिम सोहळा अतिशय उत्साह आणि जल्लोशात पार पडला. चिंचवडच्या प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात शनिवारी (दि. 28 ) झालेल्या या स्पर्धेत सौभाग्यवती गटात गौरी थोरात यांनी तर कुमारी गटामध्ये डॉ. योगिनी घुटके यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला.

या सोहळ्याच्या उदघाटन प्रसंगी शरयु रणजित देशमुख, मेघराजराजे भोसले, सुशांत शेलार, स्नेहल प्रवीण तरडे, सृष्टी पगारे, शरद पाटील, वरिष्ठ पोलीस अधिकारी डॉ. विठ्ठल जाधव, लेफ्ट. डॉ . जितेंद्र देसले, प्रसाद पाटील, डॉ . सदानंद राणे आणि आयोजिका विजया मानमोडे उपस्थित होते.

या स्पर्धेत कुमारी आणि सौभाग्यवती आशा एकून 33 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. सहभागी स्पर्धक आणि आलेल्या पाहुण्यांचे ढोल ताशा तुतारीच्या गजरात पारंपरिक पद्धतीने भव्य स्वागत करण्यात आले. सावित्रीबाई फुले, जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करुन स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. स्पर्धेच्या प्रथम फेरीच्या सुरवातीला अत्याचाराला बळी पडलेल्या डॉ. प्रियंका, निर्भया या सारख्या लेकींना स्मरुन दीपज्योती लावून श्रध्दांजली वाहण्यात आली. त्या नंतर प्रथमच अहिराणी स्पर्धकांनी आपला परिचय करून दिला.

यावेळी विजया मानमोडे म्हणाल्या, ” महिला याच खऱ्या अर्थाने भाषा संवर्धक व वाहक आहेत. प्रत्येक स्री ही अष्टपैलु व्यक्तीमत्वाची आहे. त्यांच्या कलागुणांचा वापर भाषा संवर्धन व साहित्य संस्कृतीचा प्रचार प्रसारासाठी उपयोग व्हावा यासाठी त्यांचा आवडता विषय घेवून अस्सल मराठमोळी सौंदर्यस्पर्धा महाराष्ट्र सौदंर्यसम्राज्ञी प्रतियोगितेची सुरवात झाली. या सँर्धेला संपूर्ण महाराष्ट्रातून भरभरून प्रतिसाद दिला. म्हणून ही प्रतियोगिता आता विदेशातही लोकप्रिय होत आहे. ही प्रतियोगिता आस्ट्रेलिया आणि मॉरिशसला घेण्याचे विचार मांडले आहेत. महाराष्ट्र सौदंर्यसम्राज्ञी स्पर्धेमुळे
आपल्या पारंपारिक गोष्टी रूजवण्यास व सौदंर्यक्षेत्रात मराठी माहिला मुलींना हक्काचे भव्य व्यासपीठ देण्यास ही सौदंर्यस्पर्धा रुजवण्यास यशस्वी झाली आहे” असे विजया मानमोडे म्हणाल्या.

उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतामधून महाराष्ट्र सौदंर्यसम्राज्ञी सौदंर्यस्पर्धेची प्रशंशा केली. स्वामिनी मालिकेमध्ये रमाबाई पेशवे हे पात्र साकारणारी बाल कलाकार सृष्टी आणि तिची बाहिण रिशीने सुंदर मराठी गाणे सादर करून प्रेक्षकांचे मने जिंकली.

सर्व विजेत्यांना महाराष्ट्र सौंदर्यसम्राज्ञीचा किताब सोबत त्यांना मुकुट सन्मानपत्र व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेचे आयोजन विजया सुरेश मानमोडे यांनी केले. ग्रूमिंग ट्रेनर म्हणून मृणाल गायकवाड [ मिसेस हेरीटेज ] यांनी काम पहिले. संयोजन अभिजित मानमोडे, डायरेक्टर 24 मोशन पिक्चर्स आणि टीमने केले. गिफ्ट पार्टनर कापसे पैठणी, राजहंस मिल्क प्रोडक्टस योगेश क्लॉथ साडी हे होते.

विजेत्यांना कुमारी आणि सौभाग्यवती गटात प्रथम क्रमांकास प्रत्येकी 21000 रोख, द्वितीय क्रमांकास 11000 रोख तर तृतीय क्रमांकास 5000 रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले. तसेच 24 मोशन पिक्चर्सकडून वरील सर्व विजेत्यांना 70 हजाराचे गिफ्ट व्हाउचर विभागून देण्यात आले.

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सुरेश मानमोडे, अभिजित मानमोडे, आभिषेक सुमन, छाया भदाने, शोभा पारे, दीपा माने, मीनल कडू, निखिल भदाने, विवेक शिरसाठ, नवनीत शर्मा, दिव्यकांत कांबळे, आनंद पांडे आदींनी विशेष परिश्रम घेतले.

स्पर्धेचा अंतिम निकाल पुढीलप्रमाणे-

सौभाग्यवती गट
प्रथम विजेत्या – गौरी थोरात
द्वितीय विजेत्या – अंजली दळवी
तृतीय विजेत्या – डॉ . स्वाती पडोळे

कुमारी गट
प्रथम विजेत्यां – डॉ. योगिनी घुटके
द्वितीय विजेत्यां – अश्लेशा कदम
तृतीय विजेत्यां – उत्कर्षा ढोक

विभागीय सौदंर्यसम्राज्ञी
खान्देश विभाग – प्राजक्ता करोडपती
कोकण विभाग – तेजस्विनी भिसे, कु. श्रद्धा शेळके
मराठवाडा विभाग – जयश्री भगत
पश्चिम महाराष्ट्र – सुवर्णा पालवे.
विदर्भ विभाग – कु. पुनमा इंगळे,  डॉ .रसिका गोंधळे, डॉ .शरयू दिंगालवार, डॉ . मीनल चौधरी.

सोशल मीडियाची सर्वात लोकप्रिय महाराष्ट्र सौदंर्यसम्राज्ञीचा ‘किताब गौरी थोरात यांनी आणि कु. गटात कु. वैष्णवी घोरपडे यांनी पटकवला.

विशेष शीर्षकाचा ‘किताब खालील सौंदर्यवतींना मिळाला.
सुकेशनी – दीपाली सोनवणे,
उत्कृष्ट परिचय –पूनम अहिरे
उत्कृष्ट परिधान – रोशनी सहारे
उत्कृष्ट पदक्रमण – अंजली खोमणे
प्रेरणादायी व्यक्तिमत्व – वैशाली वाघमारे
गुण कौशल्य – वैशाली खापरे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.