Pune : ताडीवाला रस्त्यावर इमारतीच्या तळमजल्यावर आग

एमपीसी न्यूज- ताडीवाला रस्त्यावर हॉटेल पंचरत्नसमोर हेरिटेज या तीन मजली इमारतीच्या तळमजल्यावरील पोलॅरिस लिकर प्रा. लि या कंपनीच्या कार्यालयाला आग लागून कार्यालयातील कागदपत्रे, इलेक्ट्रिक वायरिंग आणि 9 संगणक जाळून खाक झाले. ही घटना आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

घटनेची माहिती मिळताच कसबा पेठ, पुणे स्टेशन आणि भवानी पेठ अग्निशमन केंद्रातून तीन बंब घटनास्थळी रवाना झाले. सुमारे 15 मिनिटांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

स्टेशन ऑफिसर विजय भिलारे, प्रभारी अधिकारी सुनील नाईक, फायरमन संदीप रणदिवे, संजय जाधव, दळवी, कुंभार यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.