Pimpri News : प्रेरणा माने ‘सौंदर्यसम्राज्ञी’, अमित मोहिते ‘महाराष्ट्राचा सम्राट’ तर, आरुष सोनवणे ठरला ‘महाराष्ट्राचा युवराज’

एमपीसी न्यूज – खान्देश अहिराणी कस्तुरी साहित्य सांस्कृतिक कला, क्रीडा मंचच्या वतीने ‘महाराष्ट्र सौंदर्यसम्राज्ञी आणि सम्राट’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. प्रसिद्ध अभिनेते मिलिंद गुणाजी यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी (दि.24) कलासागर हॉटेल कासारवाडी येथे हा कार्यक्रम पार पडला.

रावेतच्या प्रेरणा माने यांनी सौंदर्यसम्राज्ञी तर, मुंबईच्या अमित मोहिते यांनी महाराष्ट्राचा सम्राट हा किताब पटकावला. रावेतचा आरुष सोनवणे हा महाराष्ट्राचा युवराज या किताबाचा मानकरी ठरला. ‘एमपीसी न्यूज’ हे या स्पर्धेसाठी माध्यम प्रायोजक होते.

सर्व विजेते स्पर्धक तसेच प्रमुख पाहुणे व संयोजक

या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध अभिनेते मिलिंद गुणाजी, अभिनेत्री श्रेया बुगडे, अभिनेता पॅडी कांबळे, राधिका पाटील , चित्रपट निर्माते कैलास वाणी, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ अध्यक्ष मेघराजराजे भोसले, अक्षय बनकर , कैलास दवंगे, कैलास वाणी, रवींद्र वारडे, विजया मानमोडे व चारुशीला देशमुख, एमपीसी न्यूजचे बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर अनुप घुंगुर्डे आदी मान्यवर उपस्थित होते.

खान्देश अहिराणी कस्तुरी साहित्य सांस्कृतिक कला क्रीडा मंचच्या अध्यक्षा विजया मानमोडे या सौंदर्य स्पर्धेच्या आयोजक आहेत तर, चारुशीला देशमुख या सह-आयोजक होत्या. मराठी-बोलीभाषा संवर्धन व साहित्य कला – वस्त्र संस्कृतीला प्राधान्य देणारी महाराष्ट्रातील ही प्रथम अस्सल मराठमोळी सौंदर्य स्पर्धा आहे. स्पर्धेचे हे तिसरे पर्व होते.

कुमारी गटातील विजेती अमृता गोसावी

विजया मानमोडे म्हणाल्या, ‘महिलाच खऱ्या अर्थाने भाषा संवर्धक व वाहक आहेत. त्यांना त्यांच्याच कलेने व्यासपीठ उपलब्ध करून दिले तर, भाषा संवर्धन तसेच वस्त्र, कला आणि संस्कृतीच्या प्रचार व प्रसाराला मोठी चालना मिळेल. या माध्यमातून अनेक युवती-महिलांचे कलागुण समोर येतील. पाश्चात्य जीवनशैलीच्या आहारी गेलेले व इंग्रजीचा पगडा असलेली लोकं सुध्दा आपली भाषा संस्कृतीची आवड निर्माण होऊन आत्मियतेने स्पर्धेत सहभागी होतात ही आनंदाची बाब आहे.’

 

मिलिंद गुणाजी म्हणाले, ‘अशा मराठमोळ्या सौंदर्यस्पर्धा व्हायला पाहिजेत. भाषा आणि संस्कृती संवर्धनासाठी स्वयंस्फूर्तीने प्रयत्न करणा-या विजया मानमोडे आणि चारुशीला देशमुख यांचे मनापासून अभिनंदन.’

सम्राट महाराष्ट्राचा किताबाचा मानकरी अमित मोहिते

सविस्तर निकाल खालील प्रमाणे

महाराष्ट्र सौंदर्यसम्राज्ञी

सुवर्ण गट

प्रथम विजेती – प्रेरणा किरण माने (रावेत)
प्रथम उप-विजेती- श्रद्धा ढोमणे (नागपूर )
द्वितीय उप-विजेती- ज्योती पाटील (नागपूर)

रूपेरी गट

प्रथम विजेती -डॉ. दीपाली आचार्य (कोपरगाव)
प्रथम उप-विजेती – सुरेखा क्षीरसागर (पुणे)
द्वितीय उप-विजेती – ज्योती पाटील (इचलकरंजी)

कुमारी गट

प्रथम विजेती – अमृता गोसावी (सोलापूर)
प्रथम उप-विजेती- डॉ. तन्वी उगाळे (पुणे)
द्वितीय उप-विजेती- आदिती तेलंग (नागपूर)

सम्राट महाराष्ट्राचा

मुख्य विजेता- अमित मोहिते (मुंबई)
प्रथम उप-विजेता – विक्रांत अहिरे (पिंपरी चिंचवड)
द्वितीय उप-विजेता – अमोल देवंन

चिन्मयी सूर्यवंशी

बालगट युवराज्ञी

मुख्य विजेती – चिन्मयी हर्षाली सूर्यवंशी (धुळे)
प्रथम उप-विजेती- सम्यक बोदडे (भुसावळ)
द्वितीय उप-विजेती – निधी मुंडके (जळगाव)

युवराज महाराष्ट्राचा विजेता – आरूष वाल्मिक सोनवणे (रावेत)

कार्यक्रमासाठी परीक्षक म्हणून अभिनेता पॅडी कांबळे, डॉ.स्वाती पडोले, लोककवी प्रशांत मोरे, ज्योत्स्नाराजे गायकवाड , गौरी भडांगे यांनी काम पाहिले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन – चेतन म्हस्के आणि सिध्दी पाटणे यांनी केले. ग्रुमिंग प्रशिक्षक म्हणून मयुरेश महाजन, रंगभूषा वैशाली भगोडिया, केशभूषा नफिसा लोखंडवाला आणि पारंपारिक दागिने यांचे फॅन्सी रे यांनी काम केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अभिजित मानमोडे, सुरेश मानमोडे, डॉ. जितेंद्र देसले, चारूलता जाधव, छाया भदाने, शोभा पारे, योगेश सूर्यवंशी यांनी परिश्रम घेतले.

 

एमपीसी न्यूजचे अनुप घुंगुर्डे यांचा सन्मान करताना श्रेया बुगडे, मिलिंद गुणाजी, पॅडी कांबळे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.